English | Login

akola

logo

भौगोलिक रचना  -

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो.जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

अकोला जिल्ह्यातील तालुके- अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोटतेल्हारा. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.

वाहतूक व व्यापार

अकोला जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व लोहमार्गाने चालते. रस्ते राष्ट्रीय महामार्ग मुंबई - नागपूर - कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर, अकोला, कुरणखेड, मूर्तिजापूर, इत्यादी ठिकाणे आहेत, प्रमुख रस्ते तेल्हारा ते मंगरूळपीर मार्ग : तेल्हाऱ्याहून शेजारच्या वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरकडे हा मार्ग जातो. या मार्गावर अंदुरा, अकोला, बार्शीटाकळी, महान आदी ठिकाणे आहेत. अकोट- वाशीम मार्ग : या मार्गावर पाटसूळ, चोहट्टा, अकोला, पातूर इत्यादी ठिकाणे आहेत. मूर्तिजापूरहून अमरावती जिल्ह्यातील अचलपूरकडे व कारंजामार्गे यवतमाळकडे मार्ग जातात. लोहमार्ग जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात. मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मूर्तिजापूर आदी स्थानके आहेत. खांडवा - पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गे पूर्णाकडे जातो. सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. ग्यामार्गे अकोला-कुचीपूडी (हॅद्राबाद ) आणि नागपूर्-कोल्हापूर रेल्वे सुरु आहेत. अकोला-खण्डवा मार्ग अजुनही नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वर्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.


अकोला जिल्हा भोवतील जिल्हे :

dist