English | Login

akola

logo

अकोला जिल्ह्याचा इतिहास  -

अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात-१९व्या शतकात- बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत.नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य ह्या तर आहेतच अकोल्याच्या लक्षणीय गोष्टी. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते. अकोला या शहराशीदेखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले.

अकोला हे उत्तर महाराष्ट्रातीलमहाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडणारा हा जिल्हा १९५६ साली मुंबई प्रांतात सामील करून घेण्यात आला व त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पुर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.ghad

asad ghar

rajeshwar mandir